बटाटा सॅंडविच टोस्ट: बटाटा संडविच टोस्ट हे सकाळी नाश्त्याला किंवा संद्याकाळी चहा बरोबर छान आहेत. बटाटा सॅंडविच टोस्ट हे चवीला टेस्टी लागतात. आपण नेहमी ब्रेडचे सॅंडविच बनवतो त्यापेक्षा बटाट्याचे बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडतील.
The English language version of the recipe and preparation method of this Batata Sandwich can be seen here- Potato Sandwich
बनवण्यासाठी वेळ: 40 मिनिट
वाढणी: ८ बनतात
साहित्य:
३ मोठ्या आकाराचे बटाटे
२ हिरव्या मिरच्या
१/२” आले
२ टे स्पून तांदूळाची पिठी
१ छोटे गाजर (किसून)
मीठ चवीने
चटणीकरीता:
१/२ कप नारळ (खोवलेला)
२ हिरव्या मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
१/२” आले तुकडा
१ टी स्पून लिंबूरस
१/४ कप कोथंबीर+पुदिना पाने
मीठ व साखर चवीने
२ टे स्पून पाणी किंवा नारळ फोडल्यावर नारळाचे पाणी
कृती:
चटणी करीता: खोवलेला नारळ, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, लिंबूरस , कोथंबीर, पुदिना, मीठ, साखर व पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यावी.
बटाटे उकडून, किसून घ्यावे त्यामध्ये हिरवी मिरची व आले वाटून घालावे, तांदुळाची पिठी, किसलेले गाजर, मीठ घालून मिश्रण एक जीव करावे मग त्याचे एक सारखे १६ चपटे मध्यम आकाराचे गोळे बनवावे.
एक चपटा गोळा घेवून त्यावर एक टी स्पून चटणी लावून त्यावर दुसरा गोळा ठेवून कडेनी दाबून घ्यावे. अशी सर्व सॅंडविच तयार करून घ्यावीत.
नॉन स्टिक पँन गरम करून त्यावर थोडे तेल लाऊन एक सगळे सॅंडविच लाऊन कडेनी थोडे तेल घालून दोनीही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.
बटाटा सॅंडविच टोस्ट हे टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.