काजूचे मोदक: मोदक हे गणपती बापांचे आवडते आहेत. मोदक हे सर्वांना आवडतात. मोदक आपण बऱ्याच प्रकारचे बनवतात. काजूचे मोदक हे अप्रतीम लागतात. हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत.
काजूचे मोदक गणपती आरती नंतर खिरापत म्हणून सुद्धा द्यायला छान आहेत.
The English language version of this Kaju Modak recipe and it’s preparation method can be seen here – Cashew Nut-Mawa Modak
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २० मोदक
साहित्य:
२ कप खवा
१ कप काजू
१ १/२ कप साखर (पिठीसाखर करून)
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ कप दुध
कृती:
काजू दुधामध्ये एक तास भिजत ठेवा मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईमधे खवा मंद विस्तवावर थोडासा भाजून घ्या मग त्यामध्ये काजू पेस्ट व पिठीसाखर घालून थोडे घट्ट होई परंत परतून घ्या. घट्ट झाल्यावर विस्तव बंद करून खव्याचे मिश्रण थंड करायला ठेवा.
खव्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करून मळून घ्या. मग मिश्रणाचे एक सारखे २० गोळे बनवून मोदकाचा आकार द्या. किंवा मोदकाच्या साचात घालून मोदकाचा आकार द्या.