रिबन शेव: रिबन शेव म्हणजे रिबनच्या आकाराची चकती वापरून शेव बनवणे. ही शेव दिसायला पण छान दिसते. रिबन शेव ही दक्षिणभागात लोकप्रिय आहे. रिबन शेव दिवाळी फराळासाठी बनवायला चांगली आहे.
The English language version of this Sev recipe and its preparation method can be seen here- Attractive Ribbon Sev
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ५-६ जणासाठी
साहित्य:
२ कप तांदळाचे पीठ
१ १/२ कप बेसन
२ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून वनस्पती तूप
१/२ टी स्पून खायचा सोडा
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने
तेल शेव तळण्यासाठी
कृती:
तांदळाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, सोडा, हिंग, मीठ घालून चाळून घ्या. मग त्यामध्ये वनस्पती तूप गरम करून घाला व चांगले मिक्स करा. पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्या. पीठ मुलायम होई परंत मळायला पाहिजे.
कढईमधे तेल गरम करायला ठेवा. सोरयामध्ये शेवेचे पीठ भरून आडवी चीर असलेली चाकी बसवून गरम तेलात गोल आकाराची रिबन शेव घाला. शेव उलट करून विस्तव कमी करा. दोनी बाजूनी शेव कुरकुरीत होई परंत तळून घ्या.
तळलेली शेव पेपरवर ठेवून थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.