गव्हाच्या रव्याचे डोसे: गव्हाच्या रव्याचे डोसे हे छान कुरकुरीत होतात. गहू हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे हे आपल्याला माहीत आहेच. गव्हाचा बारीक रवा हे डोसे बनवण्यासाठी वापरावा. लहान मुलांना हे डोसे खूप आवडतात. रव्याचे डोसे सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर द्यायला छान आहेत.
The English language version of this Wheat Flour Dosa recipe and the preparation method can be seen here – Gehun Ke Suja Ka Dosa
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ६ डोसे
साहित्य:
२ कप रवा – बारीक
एक चिमुट सोडा-बाय-कार्ब
१ मध्यम कांदा – बारीक चिरलेला
१ मध्यम तमाटा – बारीक चिरलेला
१ हिरव्या मिरच्या – बारीक चिरलेल्या
१/४ कप नारळ – खोवलेला
चावी नुसार मीठ
डोसा तळण्या साठी तेल
कृती:
रात्री दही व रवा मिक्स करून भिजत ठेवा. सकाळी डोसे बनवतांना त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, सोडा, मीठ घालून मिक्स करावे. जरूर असेल तसे पाणी घालावे. डोश्याचे मिश्रण फार घट्ट किंवा फार पातळ नसावे.
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर एक टी स्पून तेल लाऊन १/२ कप मिश्रण तव्यावर घालून एक सारखे पसरून घ्या. कडेनी थोडेसे तेल घाला. दोनी बाजूनी डोसा छान भाजून घ्या.
गरम गरम रव्याचा डोसा सर्व्ह करा. सर्व्ह करतांना त्यावर बारीक चिरलेला टोमाटोने सजवा मग सर्व्ह करा.