दुधीभोपळ्याचा दालचा: दालचा ही डीश हैदराबाद मधील लोकप्रिय डीश आहे. आपण मटणाचा दालचा, चिकनचा दालचा बनवतो तसेच दुधीभोपळ्याचा दालचा ही एक लोकप्रिय डीश आहे. ह्या दलचा चवीस्ट लागतो. दालचा बनवतांना चणाडाळ, तुरडाळ, मुगडाळ, मसूर डाळ वापरली आहे. डाळी ह्या किती पौस्टिक आहेत ते आपल्याला माहीत आहेच. तसेच दालचा मध्ये दुधीभोपळा, बटाटा, कांदा, टोमाटो, मेथी वापरली आहे त्यामुळे ह्याला चांगली चव येते. जे डायटिंग करतात त्याच्या साठी ही डीश चांगली आहे ह्याने पोट सुद्धा भरते.
The English language version of this Bottle Gourd Dalcha recipe and its preparation method can be seen here – Kaddu Ka Dalcha
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१/२ कप चणाडाळ
१/२ कप तुरडाळ
१/४ कप मुगडाळ
१/४ कप मसूरडाळ
२ कप दुधीभोपळा फोडी
१ छोटा बटाटा
१ मध्यम आकाराचा कांदा
२ छोट्या आकाराचे टोमाटो
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टे स्पून आल-लसूण पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती:
दुधीभोपळा धुवून, सोलून, १” च्या फोडी कापून घेऊन ४-५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. कांदा, बटाटा व टोमाटोच्या चौकोनी फोडी करा.
कोथंबीर, आले-लसूण बारीक वाटून घ्या.
तुरडाळ, चणाडाळ, मसुरडाळ, मुगडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून हिंग, कांदा, टोमाटो, घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला कोथंबीरीचा मसाला, हळद, बटाटे घालून ५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ घालून १/२ कप पाणी घालून मिक्स करून ४-५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
मसाला व बटाटे शिजल्यावर त्यामध्ये शिजवलेल्या डाळी घालून, चिंचेचा कोळ, चिरलेली मेथी, शिजवलेला दुधीभोपळा मिक्स करून १०-१२ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
गरम गरम दालचा चपाती बरोबर किंवा भाता बरोबर सर्व्ह करा. सोबत काकडीची कोशंबीर सर्व्ह करा.
Simple and good recipe