खमंग शेगदाणे चटणी: ही चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर टेस्टी लागते. जर घरात कधी भाजी नसेल तर ही चटणी बनवायला चांगली आहे. अश्या प्रकारची चटणी खेडेगावात भाकरी बरोबर देतात ह्याची चव निराळीच लागते. खमंग चमचमीत लागते.
The English language version of the same Peanuts Chutney recipe and its preparation method can be seen here – Onion Chutney
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
७-८ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१/२ कप शेगदाणे कुट (जाडसर)
मीठ चवीने
कोथंबीर सजावटीसाठी
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती:
कांदा, आले-लसूण बारीक चिरून घ्या,शेगदाणे भाजून साले काढून जाडसर कुटून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कांदा, आले-लसूण घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून शेगदाणे कुट घालून मिक्स करून थोडे तेल सुटे परंत परतून घ्या. नंतर कोथंबीरीने सजवा. ही चटणी २-३ दिवस छान टिकते व चवीस्ट लागते जर भाजी नसेल तरी चलते.