इडलीची सुकी चटणी: इडली, डोसा किंवा वडापाव ह्या बरोबर ही सुकी चटणी चवीस्ट लागते. ही चटणी २-३ दिवस छान राहते. त्याच बरोबर ह्या चटणीवर तेल अथवा तूप घालून भाकरी बरोबर सर्व्ह करता येते.
The English language version of this Dry Chutney recipe and its preparation method can be seen here – Dry Chutney for Idli Dosa
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप उडीदडाळ
३/४ कप चणाडाळ
५-६ लाल सुकी मिरची
२ टे स्पून तीळ
१ टे स्पून कडीपत्ता
१/४ कप सुके खोबरे (किसून)
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
कृती:
कढईमधे एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये उडीदडाळ, चणाडाळ, तीळ, लाल मिरची, कडीपत्ता पाने, मीठ, व सुके खोबरे घालून ५ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
फोडणी करीता एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग घालून फोडणी वाटलेल्या चटणीवर घालून मिक्स करावी.