नाचणी पोहे लाडू: नाचणी पोहे लाडू हे पौस्टिक आहेत. मुलांना शाळेत जातांना किंवा डब्यात द्यायला चांगले आहेत. नाचणी ही आरोग्यासाठी थंड आहे. नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कँल्शीयम व प्रोटीन आहे. आजारी माणसासाठी नाचणी ही लाभदायक आहे. नाचणी ही थोडी रुक्ष असते त्यामुळे लाडू बनवतांना त्यामध्ये पोहे भाजून टाकावेत. नाचणीचे लाडू चवीला छान खमंग लागतात. ज्यांना मधुमेह आहे त्यांना नाचणी फायदेशीर आहे. अशक्तपणा आला असेलतर नाचणीचे जरूर सेवन करावे. नाचणीचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे जे डायट करतात त्यांनी नाचणीचे नियमित सेवन करावे त्यामुळे वजन घटते. नाचणीचे अनेक प्रकार बनवता येतात. ह्या अगोदर आपण नाचणी ओट लाडू पहिले ते पण चवीला खूप छान लागतात.
नाचणीचा एक महत्चा फायदा म्हणजे ज्या महिला गरोदर आहेत त्याच्या साठी नाचणी लाडू खूप फायदेशीर आहेत.
The English language version of the Nachani Ladoo recipe and its preparation method can be seen here – Ragi Ke Ladoo
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५ लाडू बनतात
साहित्य:
२ कप नाचणीचे पीठ
३/४ कप पोहे
१/२ कप सुके खोबरे (किसून)
१ १/४ कप पिठीसाखर
३/४ कप साजूक तूप
१/४ कप दुध
१/४ कप काजू,बदाम जाडसर पूड
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून घ्या. पोहे मंद विस्तवावर थोडे भाजून घ्या व थंड झाल्यावर थोडेसे कुस्करून घ्या. काजू बदाम जाडसर कुटून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून नाचणीचे पीठ घालून मिक्स करून १०मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. नाचणीचे पीठ भाजून झाल्यावर त्यामध्ये कोमट दुध हळूहळू घालून हलवा रहा पीठ फुलून आले की विस्तव बंद करा. नंतर भाजलेल्या पिठात भाजलेले खोबरे, पोहे, ड्रायफ्रुट, पिठीसाखर, वेलचीपूड घालून मिक्स करून घेऊन मध्यम आकाराचे लाडू बनवून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.