Lasoon Sev for Diwali Faral Recipe in Marathi

Garlic Sev
Lasoon Sev

लसूण शेव: लसूण शेव ही दिवाळी फराळात बनवायला छान आहे. लसूण शेव महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. लसणाची शेव छान चमचमीत लागते. लसूण शेव बनवायला अगदी सोपी आहे. तसेच घरच्याघरी बनवायला चांगली आहे. लसूण शेव बनवतांना पाणी व तेल चांगले फेटून घेतले आहे त्यामुळे शेव छान हलकी होते. लहसुण शेव दिवाळीच्या फराळात बनवुन बघा नक्की आवडेल.

The English language version of this Garlic Sev recipe and its preparation method can be seen here – Lasun Sev

बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १०-१२ जणासाठी

साहित्य:
४ कप बेसन
१ कप तेल
१ कप पाणी
४ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१५ लसूण पाकळ्या
मीठ चवीने
तेल शेव तळण्यासाठी

Garlic Sev
Lasoon Sev

कृती: 
लसूण सोलून त्यामध्ये २ टे स्पून पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊन गाळून घ्या. १ कप पाणी व १ कप तेल परातीत घेऊन मिश्रणाला पांढरा रंग येई परंत फेटून घ्या व त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, हळद, लसणाचे पाणी घालून मिक्स करून त्यामध्ये बेसन मिक्स करून लागेल तसे पाणी वापरून पीठ चांगले मळून घ्या.
कढईमधे तेल गरम करायला ठेवा. सोरयामध्ये शेवेचे पीठ भरून बारीक भोकाची चाकी लावा. नंतर गरम तेलात सोरयानी गोलाकार शेव घाला. शेव घालतांना विस्तव मोठा ठेवा. शेव घातल्यावर लगेच शेव उलट करून विस्तव बारीक करा सोनेरी रंगावर शेव तळून घ्या. तळलेली शेव पेपरवर ठेऊन थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.