आजकाल काही महिन्या पासून डेंगू व चिकुनगुन्या ह्या व्हायरलने खूप थैमान मांडले आहे. चिकुन गुण्या व डेंगी हा रोग Aedes Aegyptih ह्या मछरांच्या चावण्यामुळे होतो. पावसाचे पाणी साठून त्या पाण्यात किंवा साठवलेल्या पाण्यात हे मछर तयार होतात. आपली रक्त तपासणी करून ह्या रोगाचे निदान केले जाते. चिकुन गुण्या हा व्हायरल रोग झाल्यावर त्यावर औषध उपचार झाल्यावर सुद्धा व चिकुनगुन्या बरा झाल्यावर सुद्धा सांधेदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात होतो. सांधे दुखीवर फक्त पेन किलर घ्यावे लागते पण पेन कीलरचे बरेच दुष्परिणाम होतात. पेन किलर न घेता एक तेल घरीच बनवा व रोज २-३ वेळा सांधे दुखतात तेथे लावा त्यामुळे बराच आराम वाटतो.
The Marathi language video Chikungunya Symptoms Pain Relief Home Remedy be seen on our YouTube Channel of Chikungunya Symptoms Pain Relief Home Remedy
चिकुनगुन्या हा रोग झाला हे कसे ओळखावे.
१०२ परंत ताप येणे व ताप येण्यामध्ये चढ उतार होणे.
तापामध्ये थंडी वाजून येणे.
अंगावर लाल चट्टे येणे व अंग दुखणे.
सांधेदुखी चालू होणे, पोट दुखी व उलटी होणे.
शरीरात अशक्तपणा येणे, भूक न लागणे.
डोळे दुखणे ही लक्षणे चालू झालीकी लगेच तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन औषध उपचार चालू करावा.
चिकुनगुन्या बरा झाल्यानंतर सुद्धा सांधे खूप दुखतात तेव्हा सोपा उपाय म्हणजे पेशंट पेन किलर घेतात व ते पेन किलर तात्पुरता उपयोगी पडतात. पेन किलर घेण्याच्या आयवजी खाली दिलेले तेल घरी बनवून त्याने मसाज करावा त्याने आराम मिळेल.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
प्रमाण: १०० ग्राम
साहित्य:
५० ग्राम मोहरी तेल
५० ग्राम पांढऱ्या तिळाचे तेल
१५ लवंग
१” तुकडा दालचीनी
२ टेस्पून ओवा
१ टेस्पून मेथी
१५ लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
१” आले तुकडा (बारीक पेस्ट करून)
! टीस्पून हळद
२ मोठे तुकडे कापूर
१ टेस्पून एलोवेरा जैल
कृती:
एका कढईमधे दोनी तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर कापूर व हळद सोडून बाकीचे साहित्य घालून हालवत रहा. जवळ जवळ २०-२५ मिनिट विस्तवावर ठेऊन हालवत रहा म्हणजे जे साहित्य घातले आहे त्याचा अर्क तेलामध्ये उतरेल. मग विस्तव बंद करा.
विस्तव बंद केल्यावर त्यामध्ये कापूर व हळद घालून मिक्स करून थंड करायला ठेवावे. तेल थंड झाल्यावर गाळून मग काचेच्या बाटलीत भरून ठेवावे.
ह्या बनवलेल्या तेलाने मालीश करा त्यामुळे नक्की आराम मिळेल. कृपया पेन किलर घेऊ नका त्यामुळे तात्पुरता फायदा होतो.