पाकातल्या पुऱ्या: पाकातल्या पुऱ्या ही एक सणावाराला किंवा इतर दिवशी बनवायला छान स्वीट डीश आहे. पाकातल्या पुऱ्या ही महाराष्ट्रीयन लोकांची जुन्या काळापासून लोकप्रिय डीश आहे. ह्या पुऱ्या बनवतांना गव्हाचे पीठ व मैदा वापरला आहे व ऑरेंज ईमलशन वापरला आहे त्यामुळे पुरीला छान रंग व सुवास येतो. बेकिंग पावडर वापरल्यामुळे चांगल्या खुसखुशीत होतात. तसेच २-३ दिवस चांगल्या टिकतात.
The English language version of this Pakatlya Purya recipe and preparation method can be seen here – Maharashtrian Pakatlya Purya
The Marathi language video of this Pakatlya Purya can be seen on our YouTube Channel: Sweet Tasty Pakatlya Purya
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: 30 पुऱ्या बनतात
साहित्य:
१ कप गव्हाचे पीठ
१ कप मैदा
१ टे स्पून लोणी अथवा बटर
१ टी स्पून बेकिंग पावडर
१ कप दुध
१/४ टी स्पून ऑरेंज ईमलशन
मीठ चवीने
पाक बनवण्यासाठी:
२ कप साखर
१ कप पाणी
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
तूप पुऱ्या तळण्यासाठी
कृती:
एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी व साखर मिक्स करून मंद विस्तवावर पाक बनवायला ठेवा. पाक हा थोडासा घट्ट घट्ट झाला पाहिजे म्हणजे थोडा चिकट झाला पाहिजे मग त्यामध्ये २-३ थेंब ऑरेंज ईमलशन घालून मिक्स करून घ्या.
परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, बेकिंग पावडर, मिक्स करून घ्या मग पीठामध्ये २-३ थेंब ऑरेंज ईमलशन घालून दुध घालून चांगले पीठ मळून घ्या. मळलेल्या पीठाचे छोटे-छोटे गोळे बनवा. किंवा पीठाचे तीन समान भाग करून घ्या. एक पिठाचा गोळा लाटून घेऊन छोट्या डब्याच्या झाकणाने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्या. अश्या सर्व पुऱ्या बनवून घ्या.
कढईमधे तूप गरम करून घेऊन घ्या. पुऱ्या तेलात सोडताना विस्तव थोडा मोठा ठेवा पुऱ्या तेलात सोडल्यावर विस्तव मंद करून पुऱ्या छान कुरकुरीत तळून घ्या.
पुरी तळून झालीकी लगेच पाकामध्ये सोडा व पाकामध्ये पुरी वर खाली करा. दुसऱ्या पुऱ्या तळून झाल्याकी पहिल्या पाकात घातलेल्या पुऱ्या काढून ताटात निथळत ठेवा व दुसऱ्या तळलेल्या पुऱ्या पाकामध्ये घाला. सर्व पुऱ्या अशा प्रकारे करून ताटात उभ्या करून ठेवा म्हणजे जास्तीचा पाक निघून जाईन. नंतर पुऱ्यावर ड्रायफ्रुटने सजवा.
पाकातल्या पुऱ्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
टीप: पुऱ्या जर दोन दिवस ठेवायच्या असतीलतर लाटलेल्या पुरीवर सुरीने टोचे मारून मग तळाव्यात म्हणजे पुरी फुगणार नाही व छान कुरकुरीत तळली जाईल.