इडली कशी करावी: इडली चटणी अथवा इडली सांबर हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. तसेच कधीही कंटाळा नयेणारा पदार्थ आहे. इडली डोसा हे पदार्थ म्हणजे साउथ इंडीयन पदार्थ आहे पण ते इतके लोकप्रिय झाले की सर्व्ह प्रांतात बनवले जातात. इडली ही आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. इडली चटणी किंवा इडली सांबर बनवायला फार सोपे आहे. इडली बनवतांना फक्त इडलीचे पीठ चांगले फसफसून आले पाहिजे म्हणजे इडली छान बनते. इडली रवा थोडा वापरला आहे त्यामुळे इडली खूप हलकी होते हा इडली रवा बाजारात मिळतो. तसेच इडली बनवतांना तिळाचे तेल वापरले आहे त्यामुळे इडली खूप टेस्टी लागते व सुंगध पण छान येतो. घरच्या घरी आपल्याला हॉटेल सारखी इडली बनवता येते.
The English language version of this Easy and Simple Idli making method can be seen here – Simple Homemade Idli
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३६ इडल्या
साहित्य:
२ कप साधा तांदूळ किंवा उकड्या तांदूळ
१ कप उडीदडाळ
१/४ कप इडली रवा
२ टेस्पून तिळाचे तेल
मीठ चवीने
तेल इडली बनवण्यासाठी
कृती:
तांदूळ व तुरडाळ धुऊन वेगवेगळी ७-८ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर जास्तीचे पाणी काढून मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्या.
तांदूळ व डाळ वाटुन झाल्यावर इडलीचा रवा घालून चांगले मिक्स करून परत ७-८ तास तसेच झाकून ठेवा.
इडली बनवण्याच्या वेळी त्यामध्ये मीठ व तिळाचे तेल मिक्स करा. इडलीचे मिश्रण खूप पातळ किंवा घट्ट नसावे. जाऊन पडल्यास थोडेसे पाणी वापरा.
कुकरमध्ये किंवा इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा. इडलीच्या साचाला तेलाचा हात लाऊन इडलीचे मिश्रण डावाने घाला. कुकरची शिट्टी काढून झाकण लावा व १५ मिनिट इडलीला वाफवून घ्या. मग इडली काढून घ्या.
गरम गरम इडली नारळाच्या चटणी बरोबर किंवा भाजांच्या सांबर बरोबर सर्व्ह करा.