राजस्थानी गट्टे की सब्जी: राजस्थानी गट्टेची भाजी ही पंजाबी लोकांची लोकप्रिय भाजी आहे. रगट्टे म्हणजे बेसनचे गोळे बनवून, उकडून तळून घेणे. मग ग्रेवी बनवून त्यामध्ये बनवलेले गट्टे सोडून त्याची भाजी बनवली जाते. घरात कधी भाजी नसेल किंवा आधी मधी अशा प्रकारची भाजी बनवायला छान आहे. राजस्थानी गट्टे की सब्जी ही हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तश्याच प्रकारची भाजी आपण घरी बनवू शकतो.
The English language version of this Rajasthani Bhaji recipe and preparation method can be seen here – Rajasthani Gatte Ki Sabzi
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
गट्टे बनवण्यासाठी:
२ कप बेसन
२ टी स्पून धने-जिरे पावडर
१/४ टी स्पून हिंग
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ टे स्पून तेल (गरम)
एक चिमुट खायचा सोडा
मीठ चवीने
१/४ कप तेल गट्टे तळण्यासाठी
ग्रेवी बनवण्यासाठी:
२ मोठे कांदे
१ कप दही
२ मध्यम आकाराचे टोमाटो
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१ कप ओला नारळ (खोऊन)
मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती:
कांदे सोलून किसून घ्या, टोमाटो उकडून सोलून मिक्सरमध्ये वाटुन घ्या. ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
गट्टे बनवण्या करीता: बेसन, धने-जिरे पावडर, हिंग, लाल मिरची पावडर, हळद, गरम तेल, मीठ, सोडा मिक्स करून घेऊन थोडे पाणी वापरून त्याचे घट्ट पीठ मळून घ्या. मळलेल्या पीठाचे एक सारखे ५-६ लांबट आकाराचे गोळे बनवून घ्या.
एक जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी घालून गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये बनवलेले गोळे घालून १०-१२ मिनिट गोळे मध्यम विस्तवावर शिजवून घ्या. गोळे शिजल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या गोल गोल चकत्या कापा. कढईमधे तेल गरम करून घ्या. गरम तेलामध्ये बेसनाच्या चकत्या गुलाबी रंगावर तळून घ्या.
कढईमधे उरलेल्या गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून मग किसलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घेऊन त्यामध्ये दही घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची, हळद, वाटलेले खोबरे, गरम मसाला, मीठ घालून २ कप पाणी घालून मिक्स करून घ्या, मग मंद विस्तवावर ५-७ मिनिट शिजवून घ्या.
ग्रेवीला उकळी आली की त्यामध्ये तळलेले गट्टे घालून कढईवर झाकण ठेवून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
गरम गरम राजस्थानी गट्टेच्या भाजी पराठ्या बरोबर सर्व्ह करा.