झटपट इनस्टंट रवा इडली: इनस्टंट इडली ही आपण कधीही बनवू शकतो. त्यासाठी तांदूळ डाळ भिजत घालायची गरज नाही. ही इडली बनवतांना फक्त रवा वापरला आहे. रवा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. अश्या प्रकारची इडली कमी वेळात बनवता येत. मुलांना भूक लागली तर झटपट इडली व चटणी बनवता येते. इनस्टंट रवा इडली बनवण्यासाठी रवा, दही व इनो वापरले आहे.
This English language version of the Instant Rava Idli recipe and preparation method can be seen here – Quick Rava Idli
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: १२ इडल्या बनतात
साहित्य:
२ कप रवा
१ कप दही
१ टे स्पून तेल
२ टे स्पून पाणी
मीठ चवीने
१ टी स्पून इनो
तेल इडली शाचाला लावायला
कृती: प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. इडलीच्या शाचाला तेल लाऊन ठेवा.
एका बाऊलमध्ये रवा, दही, मीठ, पाणी व तेल घालून मिक्स करून त्यामध्ये इनो घालून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण तेल लावलेल्या इडली शाचात घालून मग कुकरमध्ये ठेवा. कुकरची शिटी काढून कुकरचे झाकण लावा. मग इडली १०-१२ मिनिट मध्यम आचेवर वाफवून घ्या. तयार झालेली इडली शाचातून काढून घ्या.
गरम गरम इडली चटणी अथवा सांबर बरोबर सर्व्ह करा.