Delicious Apple Fried Rice Recipe in Marathi

Delicious Seb Fried Rice
Delicious Apple Fried Rice

अँपल फ्राईड राईस: अँपल फ्राईड राईस ही एक टेस्टी लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान डीश आहे. अँपल फ्राईड राईस हा पौस्टिक सुद्धा आहे. ह्या भातामध्ये शिमला मिर्च, श्रावण घेवडा, वापरला आहे. आपल्याला पाहिजे तर आपण ह्यामध्ये गाजर, मश्रूम वापरले तरी चांगले लागते. तसेच ह्यामध्ये सफरचंद वापरले आहे त्यामुळे चांगली चव येते. अँपल फ्राईड राईस हा आपण जेवणात सुद्धा बनवता येतो.

The English language version of the same Apple Pulao recipe and preparation method can be seen here – Seb Pulao

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२ कप तांदूळ
१ मोठे लाल सफरचंद
५ पातीचे पांढरे कांदे
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
८-१० श्रावण घेवडा शेगा
१ छोटी लाल शिमला मिर्च
१ छोटी हिरवी शिमला मिर्च
१ छोटी पिवळी शिमला मिर्च
८-१० काजू
१०-१२ किसमिस
२ टे स्पून सोया सॉस
मीठ चवीने
१ टे स्पून तेल

Apple Fried Rice
Preparation of Apple Fried Rice
Delicious Seb Fried Rice
Delicious Apple Fried Rice

कृती:
तांदूळ धुवून भात शिजवून घेऊन थंड करायला बाजूला ठेवा. भात थंड झाल्यावर सोया सॉस घालून मिक्स करून ठेवा.
पातीचा कांदा, शिमला मिर्च, फ्रेंच बीन्स उभ्या चिरून घ्या. सफरचंद धऊन निम्या सफरचंदचे चौकोनी तुकडे करा व बाकीच्या सफरचंदचे लांबट आकाराचे तुकडे करा. घेवडा थोडा शिजवून घ्या.
एका नॉनस्टिक पँन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये काजू, किसमिस, घालून कांदा, हिरवी मिरची घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये शिमला मिर्च, शिजवलेले बीन्स, मीठ घालून २-३ मिनिट परतून घेऊन त्यामध्ये सफरचंदचे तुकडे घालून थोडेसे परतून शिजलेला भात घालून २-३ मिनिट परतून घ्या.
गरम गरम सफरचंदचा फ्राईड राईस सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून सफरचंदचे स्लाईस, काजू किसमिस व कांद्याच्या पातीने सजवून घ्या.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.