कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा: कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा ही एक नॉनव्हेज कोल्हापूरची लोकप्रिय डीश आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर छान झणझणीत रस्सा येतो. कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा हा छान चवीस्ट रस्सा आहे. आपण ह्या पद्धतीने जर रस्सा बनवला तर अगदी हॉटेलमध्ये जसा बनवतात अगदी तसा बनतो.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
५०० ग्राम चिकन (बॉयलर)
२ टे स्पून कोल्हापुरी मसाला
१ मध्यम लिंबूरस
१/२ कप टोमाटो प्युरी
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टे स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
३-४ हिरव्या मिरच्या (चिरून)
ग्रेव्ही करीता: (वाटण्यासाठी)
१/२ टे स्पून तेल
२ मोठे कांदे
१/२ कप सुके खोबरे
ग्रेव्ही करीता:
१ टे स्पून तेल
१ मोठा कांदा (बारीक चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
कृती:
१ मोठा टोमाटो उकडून, सोलून मिक्सरमध्ये वाटुन घ्या.
चिकनचे तुकडे धऊन एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवा. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी, कोल्हापुरी मसाला, लाल मिरची पावडर, लिंबूरस, मीठ, तेल घालून मिक्स करून एक तास झाकून बाजूला ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून चिरलेला कांदा व सुके खोबरे गुलाबी रंगावर परतून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या.
कढाई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घेतल्यावर त्यामध्ये भिजवलेले चिकन घालून तेल सुटे परंत परतून घ्या. मग त्यामध्ये २ कप पाणी घालून कढई वर झाकण ठेवून मंद विस्तवावर चिकन १०-१५ मिनिट शिजू द्या.
चिकन शिजले की त्यामध्ये वाटलेला मसाला, मीठ, व २ कप पाणी घालून कोथंबीर घाला व ५ मिनिट शिजू द्या.
गरम गरम कोल्हापुरी तांबडा रसा पराठा/ तांदळाची भाकरी किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.