पालक पनीर पुलाव: पालक पनीर पुलाव हा एक टेस्टी पुलाव् आहे. पालक व पनीर हे आपल्या तबेतील कीती फ़ायदेशीर आहे ते आपल्याला माहीत आहेच तसेच पालकचे गुणधर्म हे मी एका लेखात लीहीले आहे. पालक पनीर पुलाव हा बनवायला सोपा आहे तसेच तो आकर्षकपण दिसतो. कांरण पालक वापरल्यामुळे छान हिरवा रंग पण येतो. पनीर वापरल्यामुळे चवीस्ट पण लागतो.
The English language version of this Palak-Paneer Rice recipe and it preparation method can be seen here – Palak Paneer Pulao-Biryani
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
भात बनवण्यासाठी:
२ कप बासमती तांदूळ
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
पनीर साठी:
२५० ग्राम पनीर
१ टे स्पून तेल
पालक बनवण्यासाठी:
२ कप पालक (वाटुन)
१ मोठा कांदा
१ मोठा टोमाटो
२ टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
१ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
४-५ मिरे
२ लवंग
३ हिरवे वेलदोडे
१” दालचीनी तुकडा
२ तमालपत्र
सजावटीसाठी:
१/४ कप तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
८-१० काजू
कृती: भात बनवण्यासाठी:
तांदूळ धुवून २०-30 मिनिट बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात ५-६ कप पाणी गरम करून त्यामध्ये धुतलेले तांदूळ, मीठ व तेल घालून मिक्स करून बोट चेपा भात शिजवून घ्या. (म्हणजेच ९०% भात शिजवून घ्या) भात शिजल्यावर जास्तीचे पाणी काढून घेऊन एका चाळणीवर भात काढून ठेवा म्हणजे भात मोकळा होईल. नंतर शिजवलेल्या भाताचे दोन भाग करा.
सजावटीसाठी: कांदा उभा पातळ चिरून घ्या. कढईमधे तेल गरम करून घ्या. कांद्यात एक टी स्पून साखर घाला मिक्स करून सर्व कांदा छान कुरकुरीत तळून घ्या. काजू सुद्धा तळून बाजूला ठेवा.
पनीर करीता: पनीरचे १” आकाराचे तुकडे करून घ्या. मग कढईमधे १ टे स्पून तेल घालून पनीर थोडे परतून घ्या.
पालक करीता: पालक धुवून मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या. कांदा, टोमाटो बारीक चिरून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घेऊन मिरे, दालचीनी, लवंग, तमलपत्र, वेलदोडे, कांदा, टोमाटो, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून पाच मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून वाटलेला पालक घालून पाच मिनिट शिजवून घ्या. पालक शिजल्यावर त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून भांडे खाली उतरवून ठेवा.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात प्रथम भाताचा एक भाग मग पालक परत भात पसरवून त्यावर दोन टे स्पून तूप घालून झाकण ठेवा व मंद विस्तवावर १०-१५ मिनिट शिजू द्या.
गरम गरम पालक पनीर पुलाव सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून तळलेला कांदा, काजू व पनीर घालून सजवा.