गुलाब जामून खव्याचे: गुलाब जाम ही डीश सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा करता येते. ह्या आगोदर आपण गाजराचे गुलाजाम, बटाट्याचे गुलाबजाम, रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहिले आता खव्याचे लोकप्रिय गुलाब जाम घरी कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने व अगदी मिठाईच्या दुकानात कसे बनवतात ते बघुया. गुलाब जाम हे सर्वाना आवडतात.
The English language version of this Khava Gulab Jamun recipe can be seen here – Tasty Mithai Shop Style Gulab Jamun
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: 30 गुलाबजाम बनतात
साहित्य:
गुलाब जामुन बनवण्यासाठी:
५०० ग्राम खवा (ताजा)
१ कप रवा ( बारीक)
१ कप दुध
१ टी स्पून वेलचीपूड
30 किसमिस
एक चिमुट खायचा सोडा
तळण्यासाठी तूप अथवा तेल
पाक बनवण्यासाठी:
३ कप साखर
१ १/२ कप पाणी
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
प्रथम बारीक रवा व दुध मिक्स करून दोन तास झाकून ठेवा.
खवा व भिजवलेला रवा मिक्स करून पुरण यंत्राला मोठ्या भोकाची चाकी लाऊन चाळून घ्या. मग त्यामध्ये एक टी स्पून वेलचीपूड एक चिमुट खायचा सोडा घालून चांगले मळून घ्या. मग मळलेल्या पीठाचे एक सारखे 30 गोळे बनवून घ्या गोळे बनवतांना त्यामध्ये एक-एक किसमिस घालून गोळा बंद करा.
एकी कडे जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी मिक्स करून पाक बनवायला ठेवा. पाक फक्त थोडासा चिकट बनवायचा मग त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
कढईमधे तूप गरम झाल्यावर एका वेळेस ६-७ खव्याचे गोळे मंद विस्तवावर चॉकलेटी रंगावर तळून घ्यावेत. गुलाबजाम तळताना अगदी हलक्या हाताने वरखाली करावेत. गुलाबजाम तळून झालेकी एका पेपरवर काढून ठेवावेत मग कोमट झालेल्या पाकामध्ये घालावेत. अश्या प्रकारे सर्व गुलाब जाम तळून घेऊन पाकामध्ये घलावेत. सर्व गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात घालून झाल्यावर भांडे परत विस्तवावर ठेवून एक उकळी आणावी व भांडे विस्तवावरून उतरवून ४-५ तास तसेच झाकून ठेवावे म्हणजे गुलाबजाम छान पाकामध्ये मुरतात व चवीस्ट लागतात.
सर्व्ह करतांना परत थोडेसे गरम करून दिले तर अजून छान लागतात.