द्लीयाचा उपमा: द्लीयाचा उपमा हा नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. दलिया हे गव्हाच्या पासून बनवले जाते. त्यामुळे हा उपमा पौस्टिक आहे. परत ह्यामध्ये गाजर, बीन्स व हिरवे ताजे मटार वापरले आहे. आपल्याला ह्यामध्ये शिमला मिर्च पण वापरता येते. द्लीयाचा शिरा व खीर सुद्धा फार छान लागते. दलिया चा उपमा बनवायला सोपा व लवकर होणारा आहे.
The English language version to the same Upma/Upit recipe and its preparation method can be seen here – Daliya Upma
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप दलिया
१ टी स्पून तेल
१ मोठा कांदा (चिरून)
१ मध्यम आकाराचे गाजर
७-८ श्रावण घेवडा
१/४ कप हिरवे मटार
१ टी स्पून लिंबूरस
साखर व मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
७-८ कडीपत्ता
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ टी स्पून हळद
कृती:
कढाई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दलिया घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन बाजूला ठेवा.
कढाईमध्ये तेल रम करून मोहरी, जिरे, कडीपत्ता, घालून चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालून २ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये दलिया, मीठ व चार कप कोमट पाणी घालून मिक्स करून कढाईवर झाकण ठेवा. दलिया शिजल्यावर त्यामध्ये लिंबूरस, साखर घालून मिक्स करा.
दलिया उपमा सर्व्ह करतांना कोथंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा,