जयपुरी खाजा: जयपुरी खाजा ही एक गोड पदार्थाची डीश आहे. दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा बनवायला छान आहे. खाजे दिसायला सुंदर दिसतात तसेच चवीला सुद्धा छान लागतात खाजे ही जयपूरची लोकप्रिय स्वीट डीश आहे.
The English language version of the same Khaja recipe and its preparation method can be seen here – Sweet and Delicious Jaipuri Khaja
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १८-२० बनतात
साहित्य:
५०० ग्राम मैदा
२ टे स्पून तूप
१/२ टी स्पून मीठ
३/४ टे स्पून पिठीसाखर
तळण्यासाठी तेल
साठ्यासाठी:
३ टे स्पून साजुक तूप
३ टे स्पून वनस्पती तूप
३ टे स्पून कॉर्नफ्लोर
कृती: मैदा फ्रीजमध्ये २-३ तास ठेवा. मग मैदा, मीठ व पिठीसाखर मिक्स करून थंड पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ 30 मिनिट बाजूला ठेवा.
साटा बनवण्यासाठी: साजूक तूप व वनस्पती तूप खूप फेटून घ्या. मग त्यामध्ये पिठीसाखर व कॉर्नफ्लोर हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
मळलेल्या पीठाचे दोन एक सारखे गोळे बनवा. एक गोळा पोळी सारखा लाटून त्यावर तयार केलेला निम्मा साटा लाऊन घ्या. दुसरा गोळा लाटून घ्या व त्यावर बाकीचा राहिलेला साटा लाऊन घ्या. मग दोनी साटा लावलेल्या पोळ्या एका वर एक ठेवून त्याची घट्ट वळकटी बनवा.
बनवलेल्या वळकटीचे १/२” आकाराच्या एक सारख्या लाट्या बनवा. मग एक लाटी घेऊन कापलेला भाग वरच्या बाजूला ठेवा व थोडासा हलक्या हातानी लाटून घ्या.
कढईमधे तेल गरम करून मंद विस्तवावर खाजे तळून घ्या. खाजे तळून झाल्यावर त्यावर दोनी बाजूनी पिठीसाखर भुरभुरून घ्या.