रेस्टॉरंट स्ताईल हराभरा पनीर मसाला: रेस्टॉरंट स्ताईल हराभरा पनीर मसाला ही एक छान जेवणामध्ये किंवा पार्टीला बनवायला डीश आहे. पनीरच्या आपण बऱ्याच प्रकारच्या डिशेश पाहिल्या आहेत. आता अजून एक चवीस्ट डीश बनवू या. ही डीश दिसायला आकर्षक आहे.
The English language version of the same Paneer Masala recipe and its preparation method can be seen here- Green Paneer Masala Gravy
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
५०० ग्राम पनीर
१ टी स्पून लिंबूरस
१ टे स्पून बटर
८-१० काजू पेस्ट
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
मसाला बनवण्यासाठी:
७-८ लसूण पाकळ्या
१” आले (तुकडा)
३-४ हिरव्या मिरच्या
१” गरम मसाला
हिरवा मसाला बनवण्यासाठी (वाटुन):
१/४ कप कोथंबीर (चिरून)
७-८ पालकची पाने (शिजवून, वाटुन)
१/२ कप पुदिना पाने (वाटुन)
फोडणी साठी:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ मध्यम आकाराचा टोमाटो (चिरून)
कृती:
पालकची पाने धुवून घ्या मग उकडून वाटुन घ्या. कोथंबीर व पुदिना पाने धुवून वाटुन घ्या. काजू थोडा वेळ भिजत घालून वाटुन घ्या. कांदा, टोमाटो बारीक चिरून घ्या. पनीरचे १/२” आकाराचे तुकडे करा.
कढाईमध्ये तेल गरम करून घेऊन जिरे , चिरलेला कांदा, टोमाटो, हिरवी मिरची घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला पालक. कोथंबीर, मीठ, पुदिना घालून २-३ मिनिट शिजवून घेऊन बटर, काजू पेस्ट, एक कप पाणी घालून २-३ मिनिट शिजू घ्या. मग त्यामध्ये पनीरचे तुकडे, मिरे पावडर घालून मिक्स करून गरम गरम पराठा बरोबर सर्व्ह करा.