Dosa with Cheese Mushroom Topping Recipe in Marathi

Dosa with Cheese and Mushroom
Dosa with Cheese Mushroom topping

डोसा पिझा स्टाईल चीज-मश्रुम टाँपिंग: आपण घरी नेहमी मसाला डोसा बनवतो. मसाला भाजी म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी, जर बटाट्याची भाजी बनवण्या आयवजी मश्रूम व चीजचे टाँपिंग केले तर डोश्याची चव निराळीच लागते. लहान मुलांना रोज काही वेगवेगळ्या डीश आवडतात. आपण अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डीश बनवल्यावर मुलेपण खुश होतील तसेच त्या पौस्टिक सुद्धा आहे. अश्या प्रकारचा डोसा व त्याप्रकारचे टाँपिंग बनवण्यासाठी मश्रूम, शिमला मिर्च वापरले आहे. तसेच टोमाटो सॉस, सोया सॉस व चीज सुद्धा वापरले आहे.

The English language of the same Dosa recipe and its preparation method can be seen here – Pizza Style Topped Dosa

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
डोसा बनवण्यासाठी:
४ कप डोसा पीठ
१/४ कप बटर
४ चीज स्लाईस
मीठ चवीने

टाँपिंग करीता :
५ मश्रूम (चिरून)
१ टे स्पून तेल
५-६ लसूण (चिरून)
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ कप शिमला मिर्च (लाल.पिवळी व हिरवी चिरून)
४-५ चेरी टोमाटो (चार तुकडे करून)
१/४ टी स्पून चिली फ्लेस्क
१/४ टी स्पून मिरी पावडर
मीठ चवीने

Dosa with Cheese and Mushroom
Dosa with Cheese Mushroom topping

कृती:
शिमला मिर्च, चेरी टोमाटो धुवून चिरून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. लसूण सोलून बारीक चिरून घ्या. मश्रुम धुवून स्लाईस कापून घ्या. चीजचे तुकडे करा किंवा किसून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, कांदा, शिमला मिर्च, चेरी टोमाटो घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
मग त्यामध्ये मश्रूम, चिली फ्लेस्क, मिरी पावडर, मीठ घालून मिक्स करून २-३ मिनिट परतून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे बटर घालून छोटे-छोटे डोसे घालून त्यावर १ टी स्पून टोमाटो सॉस लाऊन १ टे स्पून मश्रुमचे सारण ठेऊन वरतून चीज घालून २-३ मिनिट तव्यावर तसेच ठेवा.
गरम गरम पिझा सर्व्ह करा,

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.