आंबोळ्या : आंबोळ्या हा पदार्थ खर म्हणजे महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात जास्त करून बनवला जातो. ह्या आंबोळ्या मटणाच्या किंवा चिकन रस्सा बरोबर अगदी छान लागतात. मांसाहारी जेवणात चपातीला पर्याय म्हणून आंबोळ्या आहेत. आंबोळ्या ह्या मुलांना डब्यात द्यायला खूप छान आहेत व त्या पौस्टिक तर आहेतच त्या बरोबर नारळाची चटणी अथवा सॉस पण चांगला लागतो. तसेच त्या छान खरपूस पण लागतात. आंबोळ्या ह्या पचायला हलक्या असतात. त्यामुळे नॉनव्हेज बरोबर अगदी सूट होतात.
आंबोळ्या बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५ आंबोळ्या बनतात
साहित्य :
२ कप तांदूळ
१ कप उडीद डाळ
मीठ चवीने
आंबोळ्या भाजायला तेल
कृती :
१ तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून वेगवेगळे भिजत ठेवा. कमीतकमी ६-७ तास तरी भिजले पाहिजेत.
२ भिजल्यावर ते एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३) वाटल्यावर ७-८ तास मिश्रण तसेच ठेवले पाहिजे म्हणजे छान फसफसून येईल.
४) नंतर मिश्रणात मीठ व थोडेसे पाणी मिक्स करून डोश्या सारखे पीठ तयार करावे.
५) नॉन स्टिक तवा गरम करून त्याला थोडे तेल लावा. व डावाने थोडे जाडसर मिश्रण तव्यावर घाला व कडेनी चमच्याने थोडे-थोडे तेल सोडून दोनी बाजूनी आंबोळी भाजून घ्या.
६) गरम गरम मटणाच्या किंवा चिकन रस्सा बरोबर सर्व्ह करा.