बटाटा पुरी हा पदार्थ आपण किटी पार्टीला , वाढदिवसाला किवा कोणत्या पण वेळेला बनवू शकतॊ.
साहित्य
पाणी पुरीच्या पुऱ्या
१ छोटा बटाटा (उकडून)
चिंचेची चटणी
कांदा (बारीक चिरून)
शेव
कोथिम्बीर (चिरून)
नारळ (खोऊन)
दही
चटणी
१२ खजूर
चिंच
१ वाटी गुळ
१ चमचा धने पावडर
१ चमचा जिरे पावडर
१ चमचा लाल मिरची पावडर
मीठ
पुदिना पाने
कृती
खजुर धुऊन बिया काढुन १ तास भिजत ठेवा. चिंचपण भिजत ठेवा. खजुर, चिंचेचा रस काढुन त्यामध्ये गुल, साखर,मीठ,धने-जिरे पावडर घालून मिक्सर मधून काढा.
काचेच्या प्लेटमध्ये बटाटाचे तुकडे,पुरीचे तुकडे , शेव, कांदा, कोथिम्बीर, नारळ घालून वरतुन १ मोठा चमचा दही घाला. बटाटा पुरी तयार.