भेळ – Bhel हा पदार्थ आगदी सर्वांचा तोंडाला पाणी आणणारा आहे. लहान मुले असो किवा आजी-आजोबा असो सर्वांचा लाडका पदार्थ आहे. भेळ हा पदार्थ असा आहे की तो मुलांच्या पार्टीला नाश्त्यला बनवता येतो. भेळी मध्ये चिंचेची चटणी असते त्यामुळे तोंडला छान चव येते. भेळ ही फक्त महाराष्ट्रात फक्त बनवली जात नाही तर पूर्ण भारतात बनवली जाते. मुंबईची चौपाटीवरची भेळ तर जग प्रसिद्ध आहे. प्रत्येक बागेच्या बाहेर भेळीची गाडी असतेच. त्यामुळे भेळ ही खूप लोकप्रिय आहे. हीच भेळ आपण घरी बनवली तर छान व भरपूर बनवता येईल. ह्यामध्ये चिंचेचे पाणी छान जमले की भेळ अगदी अप्रतीम होते..
भेल बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य
४ वाटी चुरमुरे
२५० ग्राम फरसाण
२५० ग्राम बारीक शेव
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
१ मोठा टोमाटो (बारीक चिरून)
२ लहान बटाटे (उकडून बारीक चिरून)
१ कैरी (साले काढून बारीक चिरून)
कोथिम्बीर (बारीक चिरून)
८-१० पाणीपुरीच्या पुऱ्या
चींचेची चटणी
१ वाटी चिंच (रस काढुन)
१ वाटी गुळ, १/२ वाटी साखर
१ चमचा लाल तिखट
१ चमचा जिरे पावडर
१ चमचा मीठ
३ वाटी पाणी
वरिल सर्व मिश्रण एकत्र करून उकळून घ्या.
हिरवी चटणी
१ जुडी कोथिम्बीर
३-४ लसुन पाकळी
१५-२० पुदिनाची पाने
५ हिरव्या मिरच्या
मीठ
वरिल सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सर मधून काढा.
कृती
एका पातेल्या मध्ये चुरमुरे, फरसाण, कांदा, टोमाटो, बटाटा, कैरी, कोथिम्बीर, मीठ, पुऱ्याचे तुकडे, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, थोडी शेव घालून मिक्स करावी.
प्लेट मध्ये देण्यापूर्वी भेल वरती परत कांदा, कोथिम्बीर, टोमाटो,चिंचेची चटणी व शेव सजवून भेळ द्यावी.