मटर स्प्रिंग रोल Muttar Spring Roll हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडणारा आहॆ. गरम गरम टोमाटो सॉस बरोबर छान लागतो.
मटरचा हंगाम आला की आपल्याला मटरचे बरेच पदार्थ बनवता येतात मटरची जशी भजी बनवता येते तसेच मटरचे स्प्रिंग रोल पण बनवता येतात. मटरस्प्रिंग रोल हे साईड डीश म्हणून बनवता येतात. मटरच्या स्प्रिंग रोल चे आवरण म्हणजे रोल घरी कसे बनवायचे ते दिलेले आहे. रोल मध्ये अंडे घातल्यामुळे रोल छान होतो.
तसेच त्यामध्ये भरावयाचे सारण सुद्धा कसे बनवायचे आहे ते पण दिलेले आहे. मटर स्प्रिंग रोलचे सारणामध्ये मटर, कोबी, गाजर ह्या भाज्या घातल्या आहेत. तसेच सोया सॉस वापरला आहे. त्यामुळे टेस्टी पण लागते.
साहित्य
१ कप मैदा
१ अंडे
२ मोठे चमचे कॉर्न फ्लॉवर
मीठ चवीनुसार
भरण्या साठी सारण
१५० ग्राम कोबी
१०० ग्राम मटर
२ गाजर (किसून)
६ पातीचे कांदे
१ मोठा चमचा सोया saw स
२ मोठे चमचे तेल
अजिनोमोटो, मिरी पावडर, व मीठ चवीप्रमाणे
कृती
मैदा, कॉर्नफ्लॉवर, अंडे, मीठ व पाणी घालून डोशा प्रमाणे पीठ तयार करून, नॉन स्टिक तवावर थोडे जाडसर डोसे करून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून कांदा लालसर भाजून घ्या. नंतर त्यामध्ये कोबी, मटर, गाजार, सोया सॉस , अजिनोमोटो, मिरी पावडर व मीठ टाकून सारण करून घ्या.
डोसे थंड झाल्यावर वरतुन थोडे सारण पसरा व त्याचे रोल बनवून परत गुलाबी रंगावर थोड्या तेलामध्ये भाजून घ्या.