मटरची भजी Mutter Pakora-Bhaji. भजी म्हंटले की तोंडाला आगदी पाणी सुटतेना. हा भजाचा छान प्रकार आहॆ करून बघा.
पावसाळा चालू झाला की आपल्याला गरम-गरम चहा किंवा कॉफी बरोबर भजी बनवाविशी वाटतात. तसेच आपल्या घरच्याची पण तीच फर्माईश असते. त्यामुळे आपण कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी अशा वेगवगळ्या प्रकारच्या भजी आवडीने बनवतो. मटरची भजी बनवून बघा छान कुरकुरीत व चवीस्ट लागतात. तसेच हा एक भज्याचा वेगळा प्रकार आहे. घरी बनवा सगळे आवडीने व चवीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य
२ मोठे कांदे (उभे पातळ चिरून)
१ कप मटर चे दाणे (थोडे जाडसर मिक्सर मधून काढून)
२-३ हिरवी मिरची (बारीक चिरून)
१” आले (बारीक चिरून)
४-५ लसुन पाकळ्या (बारीक चिरून)
१/२ कप कोथिम्बीर (बारीक चिरून)
१/२ छोटा चमचा हळद
१/४ छोटा चमचा हिंग
१ कप बेसन
१ मोठा चमचा तेल (गरम)
मीठ चवी प्रमाणे
तेल तळायला
कृती
वरील सर्व साहित्य एकत्र करून एक सारखे करून घ्या व गरम तेल मध्ये भजी गुलाबी रंगावर तळुन घ्या. गरम गरम द्या.