मटर पॅटीस हा पदार्थ पार्टी मध्ये स्टारटर म्हणून पण करता यॆतॊ. मटारच्या सिझनमध्ये मटारचे बरेच पदार्थ बनवता येतात. आपण नेहमी मटारचे पराठे, मटारची पुरी, मटारचा भात, मटारचे पकोडे, मटारचे सूप आपण बनवतो. मटारचे पॅटीस बनवून बघा छान लागते. हे पॅटीस बनवायला अगदी सोपे आहे तसेच ते लवकर सुद्धा बनते.
मटर पॅटीस बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य
१/२ किलो मटर
२ मोठे चमचे आले
१ मोठा चमचा लिंबू रस
२ मोठे चमचे बेसन
२ अंडी (फेटून)
लसुन, हिरवी मिरची, मीठ चवीप्रमाणे
१ १/२ कप बिस्कीट पावडर
१ कप कोथिम्बीर
तेल तळायला
कृती
मटरचे दाणे मीठ टाकून उकडून घ्या. मटर, कोथिम्बीर , मिरची,आले, लसुन, लिंबू रस, मिक्सर मधून काढा. नंतर त्यामध्ये बेसन घालून, मळून त्याचे छोटे गोळे करा. हे गोळे बिस्कीट पावडर मध्ये घोळून अंड्यामध्ये डुबवून गरम तेल मध्ये गुलाबी रांगावर टाळून घ्या.