This is a simple and easy to follow Recipe for preparing at home Delicious Paneer Pasta/Fusilli (पनीर पास्ता) a Pasta dish combining the tastes of Pasta, Paneer and Fusilli along with some other ingredients like Cheese and Cream.
This Pasta preparation tastes great and is a sure shot hit with children as it make a great Tiffin Box dish to take to school.
I have also included the recipe for this Pasta preparation in this article for the benefit of Maharashtrian readers.
Preparation time- 15 minutes
Serves- 4 persons
Ingredients
2 Cups Fusilli (cooked)
100 Gram Paneer ( cut in small pieces)
1 Table spoon Garlic (chopped)
1/2 Table spoon Green Chilies (chopped)
1 Cheese Cube (shredded)
¼ Cup Basil leaves
Salt as per taste
½ Cup Milk
2 Table spoon Cream
½ Tea spoon Black Pepper Powder
1 Table spoon Oil
Preparation
Heat the Oil in a Pan, add the butter, Garlic, Green Chilies and fry for two minutes on a slow flame. Then add Milk, Cream, Salt , Black Pepper Powder and Paneer and fry for a minute. Add cooked Fusilli and Basil leaves and mix it well and cook for two minutes on a slow flame. then add the shreded Cheese, mix it well and serve hot.
पनीर पास्ता
पनीर पाश्ता : पनीर पास्ता हा प्रकार फार लोकप्रिय आहे. लहान मुलांना पास्ता फार आवडतो. पाश्ता हा वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतो. पास्ता बनवण्यासाठी फुसिली वापरलेली आहे. ह्या फुसिली दोन-तीन रंगा मध्ये मिळतात. त्या दिसायला पण फार छान दिसतात. त्याला दोन-तीन पीळ दिलेले असतात त्यामुळे त्या आकर्षक दिसतात त्यामुळे मुलांना फार आवडतात.
पनीर पाश्ता मध्ये पनीर वापरले आहे. त्यामुळे पास्ता चवीला चांगला झाला आहे. बेसिलच्या पानांमुळे त्याला टेस्ट पण छान आली आहे. पनीर पाश्ता आपण नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा करू शकतो.
वेळ बनवण्यासाठी : १५ मिनिट
वाढणी : ४ जणांसाठी
साहित्य : २ कप पास्ता (फुसिली) (शिजवून घ्या) १ टे स्पून आले (बारीक चिरून), १/२ टे स्पून हिरवी मिरची (बारीक चिरून), २ टे स्पून चीज (किसून), १/४ कप बेसिलची पाने (चिरून), मीठ चवीने, १/२ कप दुध, २ टे स्पून क्रीम, १/२ टी स्पून मिरी पावडर, १ टे स्पून तेल
कृती : एका प्यान मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटर, आले, हिरवी मिरची घालून दोन मिनिट फ्राय करून घ्या. नंतर त्यामध्ये दुध, क्रीम, मीठ व पनीर घालून एक मिनिट फ्राय करा. मग शिजवलेली फुसिली व बेसिलची पाने घालून मिक्स करून एक वाफ येवू द्या वरतून चीज घालून मिक्स करून सर्व्ह करा.