बटाट्याचा कीस हा उपासासाठी किंवा नास्त्या साठी पण करता येतो. हा चवीला चांगला लागतो. बटाटे हे थंड असतात पण पचायला थोडे जड असतात. बटाट्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, पोट्याशीयम, लोह असते.
The Marathi language video of this Fasting Recipe Batatyacha Kees can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Style Upvasasathi Batatyacha Kis
साहित्य :
५ मोठे बटाटे
१/२ कप दाण्याचा कुट
१ लिंबाचा रस
१/४ कप कोथंबीर
१ टी स्पून साखर
२ टे स्पून नारळ (खोवून)
मीठ चवीने
फोडणी :
१ टे स्पून तेल
१ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे
५-६ हिरव्या मिरचा (तुकडे करून)
कृती : बटाटे धुवून, सोलून, किसून घ्या. परत किसलेले बटाटे पाण्यात घालून चाळणीवर घाला.
कढई मध्ये तेल. तूप गरम करून, जिरे, हिरव्या मिरचा, बटाट्याचा कीस घालून मिक्स करा. झाकण ठेवून वरती थोडे पाणी घाला. विस्तव मंद करून दोन वाफा द्या. झाकण काढून दाण्याचा कुट, मीठ, साखर, लिंबू रस, नारळ, कोथंबीर घालून मिक्स करा. बटाटा कीस दोने – तीन मिनिट शीजुद्या.
गरम गरम सर्व्ह करा. (अशा प्रकारे आपण रताळ्याचा पण कीस करू शकतो.)
The Text of this Batatyacha Kees in English Language can be seen here: Maharashtrian Style Upvas Special Batatyacha Kis