काळी मिरीचे चिकन हे वेगळेच पण चवीला छान लागते. मिरी व बडीशेप वापरल्याने ग्रेवीला एकप्रकारचा वेगळाच सुगंध येतो. ही ग्रेव्ही जीरा राईस बरोबर चांगली लागते. ही रेसीपी जरा वेगळ्या प्रकारची आहे. घरी पार्टीला बनवू शकता. जर तुम्हाला ग्रेवी नसेल बनवायची तर थोडे घट्टसर पण बनवता येईल.
काळी काळीमीरीचे चिकन बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य :
५०० ग्राम चिकन तुकडे
३ मोठे कांदे (बारीक चिरून)
८-१० मिरी (ठेचून)
१/२ टी स्पून बडीशेप (पावडर करून)
१ टे स्पून लसून पेस्ट
२ मोठे टोमाटो (प्युरी)
२ टी स्पून धने पावडर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीनुसार
तडका किंवा फोडणी देण्यासाठी:
२ टे स्पून तेल
२-३ तमल पत्र
४-५ लवंग
१ टी स्पून जिरे
४ हिरवे वेलदोडे
कृती:
कढई मध्ये तेल गरम करून तमल पत्र, लवंग, जिरे, व हिरवे वेलदोडे घालुन १-२ मिनिट परतून घ्या व नंतर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून लसून पेस्ट टाकून १ मिनिट परता. मग धने पावडर, बडीशेप, हळद, लाल मिरची पावडर, मीठ टाकून ३ – ४ मिनिट शिजवून घ्या. नंतर २ टे स्पून पाणी व टोमाटो प्युरी घालून मग तेल सुटे पर्यत मंद विस्तवावर परता.
चिकन घालून झाकण ठेवून १५-२० मिनिट मंद विस्तवावर शीजुद्या. ग्रेवी जर पाहिजे असेल तर थोडे पाणी घाला व नंतर मिरी कुटून मिक्स करा व परत ५-७ मिनिट शीजुद्या. चिकन रस्सा तयार होतो.
गरम गरम जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.
Pepper and chicken are best combo.
Regards,
Reshu
Organic Pepper export