बुंदी रायता हे आपल्या कोशंबीरीचा पर्याय म्हणून करता येईल. हे अगदी झटपट होणारे आहे. चाट मसाला घातल्याने खट्टी- मिठी अशी चव येते. जिरे पावडर घातल्याने खुशबू पण छान येते. बुंदी रायता हे शाकाहारी व तसेच मांसाहारी जेवणामध्ये करता येते.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
बुंदी रायता
साहित्य :
२ वाट्या दही
१/४ वाटी बुंदी
मीठ, तिखट, चाट मसाला, जिरे पूड चवी नुसार
कोथंबीर
कृती :
दही घुसळून घ्या. त्यामध्ये बुंदी, मीठ, तिखट, चाट मसाला, जिरे पूड, कोथंबीर टाकून मिक्स करा. आवडत असल्यास पुदिना बारीक चिरून टाका