चॉकलेट कोकनट वडी ही ओला नारळ, कोको पावडर व चॉकलेट सॉस पासून बनवले आहे. कोको पावडर ने रंग फार छान येतो व चॉकलेट सॉसने चव छान येते. ह्या वड्या चवीला अगदी खमंग लागतात व खुटखुटीत होतात. खवा घातला की त्याला वेगळ्या प्रकारची चव येते.चॉकलेट तर सर्वाना खूप आवडते त्याची वडी बनवली तर अजूनच छान लागते.
चॉकलेट कोकनट वडी बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ३०-३५ वड्या बनतात
साहित्य :
२ कप खोवलेला नारळ
१ १/२ कप साखर
१/२ कप दुध
१ टे स्पून कोको पावडर
१ टे स्पून चॉकलेट सॉस
२ टेबल स्पून खवा
१ टे स्पून पिठी साखर
१ टे स्पून सुके खोबरे (किसून)
१ टी स्पून तूप
कृती :
एका कढई मध्ये नारळ, साखर, दुध, कोको पावडर, चॉकलेट सॉस, खवा, घालून मिश्रण अगदी घट्ट होई पर्यंत शिजवून घ्या.
नंतर मिश्रणा मध्ये पिठी साखर घालून ४-५ मिनिट परत शिजवून घेऊन तूप लावलेल्या ताटात मिश्रण थापून वड्या पाडाव्यात.