क्रिसमस चॉकलेट डेझर्ट सलाड हे सलाड फार चान लागते. आपण डेझर्ट म्हणून सुद्धा करू शकतो. फळांमध्ये चॉकलेटचे तुकडे व कोको पावडर चव वेगळीच लागते. क्रीम घातल्याने पण घट्ट सर पणा येतो व फळे घातल्याने पौस्टिकपण आहेच.
क्रिसमस चॉकलेट डेझर्ट सलाड: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१ कप सफरचंद तुकडे (सोलून, तुकडे)
१ कप केळे (तुकडे)
१/४ कप पेरू (साले काढून तुकडे)
१ कप संत्रे (सोलून, तुकडे)
१ कप चिक्कू (साले काढून तुकडे)
१/२ कप अननस (सोलून तुकडे)
२ टे स्पून डाळिंबाचे दाणे
२ टे स्पून पिठीसाखर
१ कप क्रीम (फेटून त्यामध्ये
१ टे स्पून कोको पावडर मिक्स करा)
१ टे स्पून कॅडबरी चॉकलेट (बारीक तुकडे करून)
कृती:
सर्व साहित्य मिक्स करून वरतून कॅडबरी चॉकलेटचे तुकड्यांनी डेकोरेट करून फ्रीजमध्ये थंड करून मग सर्व्ह करा.