दालचिनीचे चिकन हा एक चिकन ग्रेव्हीचा चांगला प्रकार आहे. ही ग्रेव्ही जीरा राईस बरोबर पण छान लागते. दालचीनी चा सुगंध पण छान येतो. चिकन ग्रेव्ही ह्या विविध प्रकारच्या बनवता येतात दालचीनी वापरून केलेली ही ग्रेवी अगदी चवीस्ट लागते. तसेच ह्यामध्ये संत्र्याचा जुस वापरलेला आहे त्यामुळे ह्याची चव अप्रतीम लागते. काजू, मनुके वापरले आहेत त्यामुळे दालचीनिच्या चिकन ग्रेव्हीला वेगळीच चव येते.
दालचिनीचे चिकन बनवायला वेळ:४५ मिनिट
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य : ८ चिकनचे मोठे तुकडे
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून मी
१/४ टी स्पून दालचीनी
१/४ टी स्पून लवंग पावडर
१ मध्यम कांदा (किसून)
४-६ लसून पाकळ्या
२ टे स्पून तेल
३/४ कप संत्र्याचा जूस
२ टे स्पून मनुके
२ टे स्पून काजू
कृती : एका कढईमध्ये तेल तापवून लसून टाकून थोडा परतून घ्या मग कांदा टाकून परता.
नंतर चिकन, मीठ, दालचिनी, लवंग, संत्र्याचा जूस, लाल मिरची पावडर, मनुके, टाकून मिक्स करून, झाकण ठेवून ३० मिनिट शिजू द्या. शेवटी काजूची पावडर टाकून मिक्स करून एक उकळी आणा. पराठा बरोबर गरम गरम द्या.