कोकनट रोल हा एक निराला प्रकार आहे. व चवीला पण वेगळा लागतो. नारळाचे सर्व प्रकार छानच लागतात तसेच कोको पावडर व मारी बिस्कीट घालून त्याची चव वेगळीच लागते. हे रोल लहान मुलांना आवडतात. तसेच साईड डीश म्हणून पण करता येते.
साहित्य : १ नारळ खोवलेला, २०० ग्राम मारिबिस्कीट, १/४ कप साखर, २ टी स्पून कोको पावडर, १ टे स्पून बटर, १/४ कप दुध, काजू-बदाम जाडसर कुटून
कृती : मारी बिस्कीटचा चुरा करून त्यामध्ये कोको पावडर, व नारळ एकत्र करून घ्या. नंतर त्यामध्ये दुध घालून मळून १५ मिनिट बाजून ठेवा. मग त्याचे चपाती सारखे गोळे करून लाटून घ्या.
बटर, साखर व काजू-बदाम पावडर एकत्र करून त्याचे मिश्रण करून लाटलेल्या चपाती वर लावा व चपातीचे रोल बनवून ते रोल फ्रीज मध्ये १० मिनिट ठेवा.
नंतर त्या रोलचे तुकडे करून द्या.