लवंग लतिका हा बंगाली पदार्थ आहे. जसे बंगाली रसगुल्ले प्रसिद्ध आहेत तसेच लवंग लतिका हा पण बंगाली लोकाचा दिवाळीचा आवडता पदार्थ आहे. आपण पण आपल्या दिवाळी सणाला बनवू शकतो. आपला पण एक वेगळा पदार्थ होतो.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ बनतात
साहित्य पारीसाठी :
२ कप मैदा
२ टे स्पून रवा
१ टे स्पून तूप (मोहन)
एक चिमुट खायचा सोडा
१ टी स्पून साखर
सारणा साठी :
१ कप खवा
२ टे स्पून रवा
२ टे स्पून पिठीसाखर
१ टी स्पून वेलचीपूड
२ टे स्पून काजू-बदाम (जाडसर पावडर)
साखर पाकासाठी :
२ कप साखर
१ कप पाणी
केसर किंवा केसरी रंग
तळण्यासाठी तूप
२०-२५ लवंगा.
कृती :
मैद्यामध्ये सोडा, १ टी स्पून साखर व कडकडीत मोहन टाकून पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्या.
काढई मध्ये रवा भाजून घेवून खवा थोडा भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर वेलचीपूड, काजू-बदाम पावडर घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या.
साखर व पाणी एकत्र करून थोडा घट्टसर पाक करून घ्या. त्यामध्ये केसर किंवा केसरी रंग घाला.
पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून एक टे स्पून सारण भरून घट्ट वळकुटी करून घेवून वेटोळा घाला व त्यावर एक लवंग खोचा असे सर्व लवंग लतिका बनवून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून लवंग लतिका मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळून घ्या. नंतर पाका मध्ये दोन-तीन मिनिट बुडवून ठेवा. नंतर एका ताटा मध्ये काढून थंड झाल्यावर डब्यात भरा.
The English language version of the Lavang Latika recipe is seen in the article – Here