मटर पुरी ही अगदी चविष्ट लागते. मटर हे पौस्टिक तर आहेतच व ह्याच्या पुऱ्या खुसखुशीत लागतात. तसेच त्या मसालेदार असल्याने चांगल्या लागतात. मुलांच्या ड्ब्यासाठी किंवा नसत्या साठी पण बनवता येतात.
साहीत्य : १ किलो ग्राम मटर, ७-८ हिरवी मीरची, १ १/२ टे स्पून आल–लसून पेस्ट, १/४ कप कोथंबीर, १ टी स्पून लिंबूरस, १/२ टी स्पून गरम मसाला, २ टेबल स्पून पुदिना पाने (चिरून) , मीठ चवीनुसार.
फोडणी साठी साहित्य : २ टेबल स्पून तेल , १ टी स्पून हिंग
पुरी साठी साहीत्य : २ कप आटा, १ कप मैदा, २ टेबल स्पून तेल (गरम), मीठ चवीनुसार , १ कप दुध, पाणी लागेल तसे.
तेल पुरी तळण्यासाठी
कृती : आटा , मैदा, गरम तेल, मीठ एकत्र करून दुध मिक्स करून लागेल तेवढे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. मटर, मिरची, आल-लुसन व कोथंबीर मिक्सर मधून काढून घ्या. २ टेबल स्पून तेल गरम करून हिंग घाला व मटरचे मिश्रण घालून मंद विस्तवावर १५ मिनीट भाजुन घ्या. मिश्रण थोडे सुके झाले पाहिजे नंतर त्यामध्ये मीठ, लिंबूरस, गरम मसाला,पुदिना घालून एकसारखे करून घ्या. पीठाचे लहान गोळे करून पुरी करून त्यामध्ये मटरचे १ टेबल स्पून मिश्रण भरून परत पुरी बंद करून थोडी लाटून घ्या. कढई मध्ये तेल तापवून पुऱ्या गुलाबी रंगावर तळून घ्या. ह्या गरम गरम पुऱ्या टोमाटो सॉस बरोबर द्या.