ड्रिमलँड पुडिंग (Dreamland Pudding) : ही डिश अप्रतीम लागते. कारण ह्यामध्ये फळे, आहेत, क्रीम आहे व कस्टर्ड आहे. मारी बिस्कीट व आईसक्रिम वेफर मुळे ह्याची चव निराळीच लागते. जेवणा नंतर आपण स्वीट डिश किंवा Dessert म्हणून बनवू शकता. वेगवेगळी फळे वापरून बनवू शकतो.
ड्रिमलँड पुडिंग बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
६-८ मारी बिस्कीट
६ आईसक्रिम वेफर
२ केळी
२ कप द्राक्ष
२ संत्री
१ सफरचंद
१/२ टीन अननस
थोड्या चेरीज
१ कप क्रीम
१/४ कप दुध थोडे अक्रोड तुकडे
२ टे स्पून आयसिंग शुगर
२ कप कस्टर्ड शुगर बनवून घ्या
कृती:
केळी सोलून त्याच्या गोल चकत्या करा. क्रीममध्ये आयसिंग शुगर व दुध मिक्स करा. सफरचंद, द्राक्ष, संत्री, अननस सोलून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. एका पसरत पण थोडी खोलगट प्लेट मध्ये मारी बिस्कीट थोडी चुरा करून पसरून घ्या. त्यावर आईसक्रिम वेफरचे तुकडे करून टाका. बनवलेल्या कस्टर्ड चा १/३ भाग बिस्कीट च्या लेयर वर पसरा. त्यावर केळ्याच्या चकत्या व द्राक्ष पसरा. परत त्यावर १/३ कस्टर्ड चा लेयर द्या. त्यावर सफरचंद संत्री, अननस चा लेयर द्या. परत वर राहिलेले कस्टर्ड पसरा वरतून क्रीमचा लेयर द्या. चेरीजने सजवा व थंड करून मग सर्व्ह करा.
कस्टर्ड शुगर बनवण्यासाठी
३ टे स्पून व्ह्नीला कस्टर्ड पाउडर
१/२ लिटर दुध, १ टे स्पून साखर
१/२ कप दुधात कस्टर्ड पावडर व साखर विरघळवून घ्या. बाकीचे दुध गरम करून त्यामध्ये कस्टर्ड पावडरचे दुध हळूहळू घालून मंद विस्तवावर हलवत रहा. घट्ट झाले की विस्तव बंद करा. नंतर थंड करायला ठेवा.