डेसिकेटेड कोकनट पुरी ही पुरी छान लागते. आपल्या सणाला सुद्धा वेगळी डीश म्हणून करता येईल. खवा घातल्याने पुरी खमंग लागते. तसेच खस-खास व डेसिकेटेड कोकनट घातल्याने पुरी ची चव वेगळी लागते. जायफळ घातल्याने सुगंध पण चांगला येतो.
साहित्य सारणाचे : १२५ ग्राम खवा, १/२ कप रवा, १/४ कप दुध, १/२ टे स्पून तूप, १/२ टे स्पून खस-खस, १०० ग्राम डेसिकेटेड कोकनट, १/२ टी स्पून वेलचीपूड, १/४ टी स्पून जायफळ पावडर, १ कप पिठी साखर
साहित्य आवरणासाठी : २ कप मैदा, १/२ कप दुध, मीठ चवीनुसार, ३ टे स्पून गरम तेल, पाणी
तूप तळण्यासाठी
कृती : खवा थोडासा भाजून घ्या. कढई मध्ये तूप गरम करून रवा हलका होई परंत भाजून घ्या. दुध शिंपडून मिक्स करून बाजूला ठेवा. खस-खस व डेसिकेटेड कोकनट थोडेसे भाजून घ्या. नंतर खवा, रवा, खस-खस, डेसिकेटेड कोकनट , जायफळ, वेलचीपूड, व पिठी साखर मिक्स करून सारण तयार करून घ्या.
मैद्यामध्ये मीठ, गरम तेल व दुध घालून मिक्स करून घ्या व पाणी वापरून पीठ घट्ट मळून घ्या.
अर्ध्या तासाने पीठाचे लहान गोळे करून लाटून त्यामध्ये एक टे स्पून मिश्रण घालून पुरी बंद करून थोडी लाटून घ्या. अश्या सर्व पुऱ्या करून घ्या. पण ओल्या कापडामध्ये ठेवा.
कढई मध्ये तूप गरम करून पुऱ्या तळून घ्या. ह्या पुऱ्या खूप चविष्ट लागतात.