सोपा झटपट नारळी भात हा महाराष्ट्रीयन लोकांची अगदी आवडती डिश आहे. नारळी भात करण्यासाठी आंबेमोहर तांदूळच वापरावा. कारण आंबेमोहर तांदूळ हा सुगंधी असतो. हा भात महाराष्ट्रमध्ये नारळी पोर्णिमा ह्या दिवशी करतात. ह्यामध्ये ड्राय फ्रूट घातल्याने व नारळ घतल्याने चव छान लागते.
साहित्य : २ कप तांदूळ (आंबेमोहर), २ कप नारळ (खोवून), २ कप साखर, ५-६ काजू, १०-१२ किसमिस, ४ लवंग, ५ हिरवे वेलदोडे, २ तमल पत्र, २ दालचिनीचे तुकडे, ४ टे स्पून साजूक तूप, ३ थेंब पिवळा रंग किंवा ३- ४ केसर तुकडे दुधामध्ये भिजवून
कृती : तांदूळ धुऊन अर्धा तास बाजूल ठेवा. २ टे स्पून तूप तापवून त्यामध्ये लवंग, काजू, किसमिस, तमल पत्र, दालचीनी, वेलदोडे व तांदूळ घालून ४-५ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या व खोवलेला नारळ घालून परत थोडे परतून घ्या.
मग त्यामध्ये ४ कप उकळते पाणी घालून झाकण ठेवा व भात शिजवून घ्या. भात शिजल्यावर त्यामध्ये साखर, तूप व रंग किंवा केसर मिक्स करून परत झाकण ठेवा वाफ आल्यावर झाकण काढून भात २ -३ मिनिट शिजू द्या.
गरम सर्व्ह करा व वरतून काजू व किसमिसने डेकोरेट करा.