फ्रेंच फ्राईज हे आपल्याला साईड डीश म्हणून घेता येईल. किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा करता येतील ह्या कृतीने केले तर खूप कुरकुरीत होतात. चाट मसाला व मिरे पूड टाकल्याने खट्टी- मिठी अशी चव येते. व हे झटपट पण होतात.
फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य :
३–४ मोठे बटाटे
मीठ चवीनुसार
चाट मसाला
मिरे पूड
तेल तळण्यासाठी
कृती :
बटाट्याची साले काढून बोटाच्या आकाराचे तुकडे करून मीठाच्या पाण्यात बुडवा.
नंतर कपडयावर ५-१० मिनिटे सुकवायला ठेवा.
एका कढईमध्ये तेला गरम करून बटाट्याचे तुकडे कुरकुरीत तळून घ्या. वरतून मीठ, चाट मसाला व मिरे पूड टाकून मिक्स करा.
गरम गरम सर्व्ह करा.
जर तळायचे नसेल तर एका नॉन स्टीक तव्याला १ टी स्पून तेल लावून त्यावर बटाट्याचे तुकडे ठेवून त्याला मीठ, चाट मसाला व मिरे पूड लावून परत १ टी स्पून तेल टाकून मिक्स करा. मेक्रोवेव ओव्हनमध्ये १० मिनिटे ग्रील करा.