फ्रेंच टोस्ट हे आपल्याला सकाळी नास्तासाठी किंवा रात्री हलके जेवण म्हणून सुद्धा घेता येईल. ब्रेड व अंड्यामुळे पोट सुद्धां भरते. तुपामध्ये फ्राय केल्याने खमंग लागतात. व टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह केल्याने चव पण छान लागते.
फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
फ्रेंच टोस्ट साहित्य:
४ ब्रेंडचे स्लाईस
२ अंडी
२ टे स्पून दुध
2 टी स्पून साखर
मीठ चवीनुसार
डालडा तळण्यासाठी (शालो फ्राय)
कृती:
एका स्लाईसचे दोन तुकडे करा, अंडी फेटून त्यामध्ये दुध, साखर व मीठ टाकून मिक्स करा. छोट्या फ्राईग प्यन मध्ये १/२ टे स्पून डालडा टाकून, एक-एक ब्रेड स्लाईस घेऊन अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवून फ्राईग प्यन मध्ये दोन्ही बाजूनी शालो फ्राय करावे.
टोमाटो सॉस बरोबर खावे.