फ्रुट कस्टर्ड पुडिंग हे अगदी अप्रतीम लागते. छोट्या पार्टीसाठी किंवा आपल्याला घरी झटपट करता येते. व बनवायला पण अगदी सोपे आहे. लहान मुलांना हे पुडिंग खूप आवडते. गरमीच्या दिवसात तर फारच छान लागते.
फ्रुट कस्टर्ड पुडिंग बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१/२ लिटर दुध
३ टे स्पून कस्टर्ड पावडर
१ टे स्पून साखर
३-४ थेंब व्हानीला इसेन्स
सिझनल फ्रुट (द्राक्ष, संत्री, आंबा, केळे, चिकू, अंजीर, अननस)
कृती:
कस्टर्ड शुगर बनवण्यासाठी १ कप दुधात कस्टर्ड पावडर, साखर मिक्स करून घ्या. बाकीचे दुध गरम करून कस्टर्ड पावडरचे दुध हळू-हळू मिक्स करा . मिश्रण घट्ट होई परंत मंद विस्तवावर हलवत रहा. घट्ट झाले की थंड करायला ठेवा. सर्व्ह करताना आपल्याला पाहिजे ती फळे सोलून तुकडे करून मिक्स करा. वरतून straw berry सॉसने सजवून मग थंड सर्व्ह करा.