फ्रुट पाणी पुरी हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल. त्याच बरोबर फळांचा ज्यूस पण घेतला जातो व फळे सुद्धा खाल्ली जातात आता उन्हाळ्या मध्ये हा पदार्थ खूप छान लागतो. व नेवीन सुद्धा आहे. त्यामुळे मुलांना खूप आवडेल. The English Version recipe of the same Pani Puri Preparation can be seen – Here.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य ज्यूससाठी :
३०-४० पाणी पुरी
२ कप संत्री तुकडे (सोलून तुकडे
२ कप अननस तुकडे
२ कप कलिंगड तुकडे (लाल)
साखर चवीने
पुदिना पाने (चिरून) ,
मिरे पावडर (चवीने)
पुरी मध्ये भरण्यासाठी :
१/४ कप संत्री तुकडे
१/४ कप अननस तुकडे
१/४ कप कलिंगड तुकडे
कृती : ज्यूस साठी : संत्री तुकडे १/४ कप पाणी व १ टी स्पून साखर घालून मिक्सरमध्ये ग्राईड करा. व गाळून घ्या. एका भांडया मध्ये काढून ठेवा. अननसचे तुकडे, १ टी स्पून साखर व १/४ कप पाणी घालून ग्राईड करा. गाळून बाजूला ठेवा. कलिंगड तुकडे १ टी स्पून साखर घालून ग्राईड करा. गाळून बाजूला ठेवा.
नंतर तीनही ज्यूस मध्ये २-३ पाने चिरून घाला व मिरी पावडर मिक्स करा.
सर्व्ह करताना एका पुरी मध्ये संत्री तुकडे व त्यामध्ये संत्री ज्यूस घाला व सर्व्ह करा. तसेच अननसाचे व तसेच कलिंगडाचे करा.