चिकनचे पदार्थ म्हंटलेकी सगळ्यांना आवडतात. कसुरीमेथी ही वाळवलेली घ्यायची, ही मेथी वाळूमध्ये लावतात तसेच तिची पाने लहान असतात व त्याचा कडवट सुगंध चांगला येतो. चिकन मध्ये ती खूप चांगली लागते. त्याची वेगळीच चव लागते. चिकनमध्ये कसुरी मेथी वापरल्याने खूप खमंग लागते. तसेच ही चिकन ग्रेवी जीरा राईस बरोबर खूप टेस्टी लागते. बदाम वापरल्याने ग्रेवीला थोडा घट्ट पणा येतो व साय वापरल्याने एक सुंदर तवंग येतो व ग्रेवीला रंग पण छान येतो. कसुरी मेथी चिकन ही माझी डीश फार लोकप्रिय आहे.
बनवण्याची वेळ – ४५ मिनिट
वाढणी – ४ जण
साहीत्य करीसाठी
५०० ग्राम चिकन
१ कप तेल
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
३ मोठे टोमाटो (उकडून गर मिक्सर मधून काढून)
१ छोटा चमचा तंदुरी चिकन मसाला
२ छोटे चमचे कसुरी मेथी
१ छोटा चमचा लाल मिरची पावडर
१ छोटा चमचा हळद पावडर
६ बदाम (पावडर)
१ टेबल स्पून दुधावरची साय (क्रीम)
मीठ चवीनुसार
चिकन मुरण्यासाठी मसाला
२ टेबल स्पून लसून-आले पेस्ट
२ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१ छोटा चमचा मेथी दाणे
२ हिरव्या मिरच्या
१ छोटा चमचा मीठ (सर्व मसाला वाटून घेणे)
१ मोठे लिंबू रस
१ छोटा चमचा लाल मिरची पावडर
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा चिकन तंदुरी मसाला
१ छोटा चमचा कसुरी मेथी हा सर्व मसाला चिकनला लावून ३ तास चिकन मुरत ठेवावे
कृती
कढाईमध्ये १ कप तेल तापवून चिकनचे तुकडे मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
राहिलेले तेल गाळून घेवून त्यामध्ये कांदा व चिकनचा राहिलेला मसाला चांगला भाजुन घेवून टोमाटोचा रस घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर भाजुन घ्या.
नंतर करीसाठी २ १/२ कप पाणी, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, तंदुरी मसाला, कसुरीमेथी, बदाम पावडर, फ्रेश क्रीम टाकून १० मिनिट मंद विस्तवावर झाकण ठेवुन शिजवून घ्या.
जीरा राईस व चपाती बरोबर द्यावे.