कोकणी कोळंबी करी (Prawn Gravy) ही करी मसालेदार व चमचमीत लागते. कोकणामध्ये ही करी प्रसिद्ध आहे. नारळ वापरल्याने करीला चांगला घट्टपणा येतो. जीरा राईस व तांदळाच्या भाकरी बरोबर चांगली लागते. ह्या साठी शक्यतो छोटी कोलंबी वापरावी.
The Marathi language of this Konkani/ Malvani Prawns Curry can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=YGUQwXoE8oY
साहित्य
५०० ग्राम कोलंबी
१ टेबल स्पून वनस्पती तूप
१ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
१ मध्यम टोमाटो (बारीक चिरून)
१ छोटा बटाटा (मध्यम तुकडे करून)
१/२ टी स्पून हळद
१ कप कोथंबीर
मीठ चवीनुसार
मसाला
१ कप नारळ (खोवलेला)
१ टेबल स्पून तेल
१ छोटा कांदा (चिरून)
१०-१२ लसून पाकळी
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ १/२ टी स्पून गरम मसाला
कृती
१ टेबल स्पून तेल गरम करून कांदा, लसून २ मिनिट फ्राय करून नारळ, लाल मीरची व गरम मसाला टाकून २-३ मिनिट फ्राय करून मिक्सर मधून काढून बाजुला ठेवा.
कढई मध्ये तूप गरम करून कांदा, बटाटा व टोमाटो ३-४ मिनिट मंद विस्तवावर भाजुन घ्या. नंतर त्यामध्ये कोलंबी, मीठ व हळद टाकून ५ मिनीट शिजवून वाटलेला मसाला व ३ कप पाणी टाकून हलवून, झाकण ठेवुन १० मिनीट मंद विस्तवावर शिजूद्या.
कोथंबीर टाकून गरम गरम पराठा किवा भाता बरोबर वाढा.