अननस-डेसिकेटेड कोकनट पुडींगपुडिंग हा पदार्थ असा आहे की तो आवडीने खाल्ला जातो. पुडिंग मध्ये अननस वापरला असता चव खूप छान लागते. डेसिकेटेड कोकनट व तांदूळ वारून घट्ट पणा येतो व चवपण वेगळी लागते. हे पुडिंग आपण वाढदिवसच्या पार्टीला किंवा किटी पार्टीला पण करू शकता. लहानमुले हे पुडिंग आवडीने खातात.
अननस-डेसिकेटेड कोकनट पुडींग बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य :-
१ कप अननसाचे तुकडे
२ टे स्पून तांदूळ
२ टे स्पून डेसिकेटेड कोकनट
२ कप दुध
२ टे स्पून साखर
२-३ थेंब अननस इसेन्स
२ थेंब पिवळा रंग
१/२ टे स्पून तूप
सुकामेवा डेकोरेशनसाठी.
कृती:
तांदूळ धुऊन १५-२० मिनिट न्यपकीनवर वाळत ठेवा. नंतर बारीक वाटून घ्या. अननसाचे तुकडे एका भांड्यात घेवून एक टी स्पून साखर घालून १-२ मिनिट शिजवून घ्या.
एका कढई मध्ये तूप गरम करून तांदळाची पेस्ट खमंग भाजून घ्या नंतर त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट घालून एक मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. १/४ कप पाणी घालून शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये दुध, पिवळा रंग, साखर घालून ५-७ मिनिट शिजूद्या.
थंड झाल्यावर अननसाचे तुकडे, अननसाचे इसेन्स व सुकामेवा घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.