अननसाचा मालपुवा ही एक स्वीट डिश म्हणून बनवता येईल. ही स्वीट डिश आपल्याला लहान मुलांच्या किंवा इतर वेळी सुद्धा बनवता येईल. अननसामुळे पुरीला छान सुगंध येतो व चवीला पण उत्तम लागते. तसेच जायफळ वापरल्याने पण वेगळीच चव लागते.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ मालपुवे बनतात
साहित्य : पुरीसाठी –
१ वाटी मैदा
१/२ वाटी रव
१/२ वाटी पाईनापलचे बारीक तुकडे
१ टी स्पून साखर
२-३ चिमुट बेकिग पावडर
थोडे दुध
तूप पुऱ्या फ्राय करण्यासाठी
साखरेचा पाक :
१ वाटी साखर
१ वाटी पाणी
१ टी स्पून वेलची पावडर
१/४ ती स्पून जायफळ पावडर
१ टी स्पून पिठी साखर
कृती : मैदा, रवा, अननसाचे तुकडे, साखर, बेकिग पावडर, व थोडे दुध टाकून थोडे पातळसर पीठ भिजवावे.
साखरेचा एक तारी पाक तयार करा. त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर मिक्स करा.
फ्राईग पँन गरम करून १ टेबल स्पून तूप टाकून त्यामध्ये एका चमच्यानी लहान लहान पुऱ्या टाका व बाजूनी तूप सोडून गुलाबी रंगावर भाजा. नंतर गरम पाकात ५ मिनिट भिजत ठेवा. सगळ्या पुऱ्या झाल्यावर एका डीशमध्ये नीट ठेऊन त्यावर पिठी साखर टाकून ड्रायफ्रुट टाकून डेकोरेट करा.