शाही बटाट्याचा शिरा हा पदार्थ उपासाच्या दिवशी स्वीट डिश म्हणून बनवता येते. ह्यामध्ये खवा घातल्याने चव फार छान येते. केसर, खवा व ड्राय फ्रुट घातल्याने शाही प्रकार होतो.
साहित्य : ४ मोठे बटाटे, १/२ वाटी खवा, १/२ वाटी साखर, ३ टे स्पून तूप, २ टे स्पून दुध, २-३ काड्या केसर, १ टी स्पून वेलचीपूड, थोडे मनुके, काजू-बदाम तुकडे
कृती : बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून घ्या. कढई मध्ये तूप गरम करून बटाटे खमंग भाजून घ्या. नंतर त्यामध्ये खवा घालून १-२ मिनिट भाजून घ्या. दुध घालून १-२ मिनिट भाजून घ्या. नंतर साखर, वेलचीपूड, केसर घालून मंद विस्तवावर थोडावेळ ठेवून मोकळा झाला की उतरवावा.